भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरवर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच सरावादरम्यान नमाज पठण करण्यासाठी मौलवीला बोलवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुणाल चंदिलाऐवजी इकबाल अब्दुलाला कर्णधार केल्याचा आरोपही सीएयू सचिव महिम वर्मा आणि निवड समिती चेअरमन रिजवान शमशाद यांनी केला होता. मात्र या सर्व आरोपांचे वसीस जाफरने खंडन करत उत्तराखंड टीमच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
माजी क्रिकेटपटू अनिल कुंबले आणि इरफान पठाण यांनी वसीम जाफरच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
उत्तराखंड टीमला प्रशिक्षण देण्यासाठी जाफरसोबत 55 लाखांचा करार करण्यात आला होता. तसेच मागील महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 मालिकेत उत्तराखंड टीमला 5 पैकी 4 सामने गमवावे लागले होते.