‘हमको तो तलाश नये रास्तों की है’, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे चर्चा

0
19

परमबीर सिंग यांची मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत, त्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले आहे, त्यामुळे राज्यात आता खळबळ माजली आहे. कारण त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

याबाबत राजकारणात सर्वांनी आपली भूमिका मांडली आहे, परंतु, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र आज सकाळी त्यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी शुभ प्रभात म्हणत, हमको तो बस तलाश नए रास्तो कि, हम है मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है, या जावेद अख्तर यांच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.