West Bengal: मिथुन दा ची सक्रिय राजकारणात एन्ट्री! भाजपात केला प्रवेश 

0
42

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन दीदींना हाय व्होल्टेजचा धक्का दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ब्रिगेड परेड ग्राऊंड रॅलीला हजर होण्यापूर्वीच मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकाताच्या या मैदानात कोट्यवधी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिगेड परेड मैदानाच्या रॅलीला येणार होते त्याआधी मिथुन चक्रवर्ती यांनी मोदींच्या व्यासपीठावरून भाजपचा झेंडा उंचावला आणि आपण भाजपमध्ये सामील होत असल्याचे सांगितले. पीएम मोदी उत्सुकतेने या मेळाव्याची वाट पहात होते त्यापूर्वी मिथुन दा यांनी कैलास विजयवर्गीय आणि दिलीप घोष यांच्यासमवेत भाजपचा झेंडा फडकावला.