West Bengal Assembly Election 2021:अमित शाह यांनी प्रसिद्ध केले भाजपाचे घोषणा पत्र 

0
35

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा कोलकाता येथील पार्टी कार्यालयात दाखल झाले. येथे त्यांनी बंगाल विधानसभा निवडणूक 2021 चे भाजपचे घोषणा पत्र प्रसिद्ध केले. तत्पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील आग्रा येथील निवडणूक सभेत अमित शहा यांनी पुन्हा ममता सरकारवर निशाणा साधला. अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर राज्यात घुसखोरी वाढवल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले ‘आम्ही पाच वर्षात बंगालला घुसखोरांपासून मुक्त करू.’
ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत ते अमित शाह म्हणाले  दिदीने ‘माँ, माती, माणुस’ अशी घोषणा दिली पण काय बदलले? ती तुम्हाला घुसखोरांपासून मुक्त करू शकेल का? आम्ही पाच वर्षात बंगालला घुसखोरांपासून मुक्त करू.