केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमधील न्यायालयाने बजावले समन्स 

0
43

पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. अमित शाह यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा अब्र नुकसानीचा खटला दाखल केलेले आहे. याच प्रकरणात न्यायालयाने हे समन्स बजावल आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.

बिधान नगर येथील विशेष न्यायालयाने संबंधित समन्स काढले असून हे न्यायालय खास खासदार अन आमदारांविरोधातील प्रकरणांचा निवाडा करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या न्यायालयाने अमित शाह यांना 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.