बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाने पहिला कसोटी सामना 3 गडी राखून जिंकला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात बांगलादेशने 430 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला वेस्ट इंडिज संघ 259 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे बांगलादेशकडे 171 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात बांगलादेश 8 गडी गमवत 223 धावा केल्या आणि डाव घोषित केला. वेस्ट इंडिजसमोर 394 धावांचे आव्हान होते. या डावात वेस्ट इंडिजची फलंदाजी चालणार हा बांगलादेशचा अंदाज फसला आणि वेस्ट इंडिजने 7 गडी गमवत हे लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजकडून कायल मेयरने 210 तर नक्रमा बोनर 86 धावा केल्या.