‘वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरसची उत्पत्ती नाही’

0
38

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूसंदर्भात तपास करण्यासाठी चीनमधील वुहानचा दौरा केला. या तपास दौऱ्यात वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीत जाऊन तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. वुहान आणि इतर ठिकाणी 2019 पूर्वी कोरोनाबाबत कोणतेही रुग्ण आढळले नाहीत याकडेही जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले. त्यामुळे वुहानच्या हुन्नान बाजारातून हा व्हायरस जगाच्या इतर भागात पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य एम्बरेक यांनी सांगितले.

कोरोना विषाणू वाहक प्रजातीतून मानवी शरिरापर्यंत पोहोचल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. वटवाघुळाच्या माध्यमातून हा व्हायरस आल्याबाबत ठोस पुरावे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.