बीसीसीआयने ट्विट करून मिताली राजला का दिल्या शुभेच्छा?

0
49

मिताली राज हे नाव ऐकले कि, भारताचा अभिमान जागृत होतो, कारण भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच हा टप्पा ओलांडणारी मिताली पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली असून जगभरात दुसरी क्रिकेटपटू ठरलीये.

तसेच मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करण्याचा बहुमानदेखील मिताली लवकरच मिळवेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला यासाठी बीसीसीआयने ट्विट करून मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत.