राज ठाकरे मास्क का घालत नाहीत, कोरोना झाल्यास जबाबदार कोण? -विजय वडेट्टीवार 

0
55

मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ते आज (27 फेब्रुवारी) रोजी मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, ‘ त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही’