पत्नी काही खासगी संपत्ती नाही; सुप्रीम कोर्टानं नोंदवलं मत

0
38

सुप्रीम कोर्टानं पती-पत्नी नात्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण मत दिलं आहे. पत्नी ही पतीची खासगी संपत्ती नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. पत्नीने सोबत राहावं यासाठी पतीने याचिका दाखल केली होती. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हे मत मांडलं आहे.
सन 2013 साली दोघांचं लग्न झाले होते. मात्र हुंड्यासाठी पती पत्नीचा छळ करत असल्याने पत्नी वेगळी राहात होती. त्यानंतर पत्नीने पोटगीसाठी 2015 मध्ये कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने 20 हजार रुपये दर महिना देण्याचे आदेश दिले. त्यावर पतीने कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. तेव्हा पतीच्या बाजून कोर्टाने निकाल दिला. तसेच पुढील कारवाईसाठी इलाहाबाद कोर्टात धाव घेतली. पत्नीने सोबत राहिल्यास पोटगीचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले होते. त्यावर कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर पतीने सुप्रीम कोर्टात धाव घेत पोटगीसाठी पत्नी हे सर्व करत असल्याचा आरोप त्याने केला. तसेच पतीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कौटुंबिक न्यायालयाचा निकाल समोर ठेवून पत्नीने पतीसोबत यावं यासाठी आग्रह धरला. यावर सुप्रीम कोर्टानं पत्नी खासगी संपत्ती नसल्याचे निरीक्षण नोंदवले.