Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद,येत्या ८ दिवसांनी लॉकडाऊन बाबद निर्णय…

0
84

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत .ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री संचारबंदी किंवा निर्बंधांबाबत काही निर्णय घेणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. तीन जिल्ह्यांत कडक नियम लागू केले आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

लाईव्ह अपडेट

  • लॉकडाऊन करायचा की नाही हे येत्या 8 दिवसात समजेल .अद्याप संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय नाही.

  • कोविडयोद्धा होता नाही आले तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती

  • आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव.

  • मी नेहमी शिवनेरीवर जातो मात्र यावेळेस मुख्यमंत्री म्हणून गेलो. मी तिथही सांगितलं, शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल