‘महिलांचा आदर कराल तर आदर मिळेल’, नाहीतर शिक्षा होईल!

0
42

मुंबई: ‘इज्जत दोगे तो इज्जत पाओगे’ या गाण्यातून महिलांचा अपमान करण्याऱ्या एका आरोपीला मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गाण्यातून महिलांवर खालच्या पातळीची शेरेबाजी करण्यात आली होती. हे गाणं सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर वेगाने व्हायरल झाले होते. या गाण्यातील बोल ऐकल्यानंतर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी मुंबईतील कुर्ला पूर्व भागातून एका आरोपीला अटक केली आहे. तर एक जण फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या दोन्ही आरोपींवर भारतीय दंड सहिंता आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.