सिल्लोडमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन

0
39

औरंगाबाद: सिल्लोड येथील नगरपरिषद च्या हंगामी महिला कर्मचारी पाण्याच्या टाकी वर चढून आंदोलन करत आहेत.त्यांनी काही मागण्या सिल्लोड नगर परिषद समोर ठेवल्या आहेत. यामध्ये स्वच्छता कामगारांना तात्काळ कामावर रुजू करण्यात यावे. तसेच 2 सन 2018 पासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकित किमान वेतन तात्काळ देण्यात यावे.याचबरोबर स्वच्छ भारत अभियान मध्ये फक्त चमकोगिरी करणाऱ्या सिल्लोड नगरपरिषद प्रशासनाची सखोल चौकशी करावी आणि स्वच्छ भारत अभियान नावाखाली कॉन्ट्रॅक्टरला पुढे करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणात जबाबदार जिल्हाधिकारीची चौकशी करत बोगस कॉन्टॅक्टर आर. एस. पवार कोणत्या बिळात लपून बसला आहे? त्याला शोधून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.वरील मागण्यासाठी कामावरून कमी केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते सोबत पाण्याच्या टाकी वर आंदोलन सुरू आहे.