Women’s Day च्या दिवशी करीना कपूर खानने शेअर केली मुलाची पहीली झलक

0
44

अभिनेत्री करीना कपूर 21 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई बनली असून मुलाला जन्म दिला आहे. पण तिने आतापर्यत दुसर्‍या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केली नव्हती.मात्र आज आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आपल्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोत करीना आपल्या मुलाला आपल्या खांद्यावर घेतलेली दिसत आहे.या फोटोसह करीनाने एक खास मॅसेज शेअर केला आहे.
करिनाने महिला दिनानिमित्त आपले ब्लॅक अँड व्हाइट चित्र शेअर केले. हे फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की, ‘स्त्री असे काहीही नाही जे करू शकत नाही .. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’.
करीनाच्या पहिल्या मुलाच्या नावावरून (तैमुर) सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात होते .त्यामुळे करिनाने सावधानी ठेवत मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही.मात्र आजच्या खास दिवशी बाळाची झलक दिसून आली.