शाओमीनं लॉन्च केली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही…

0
48

शाओमीनं एक इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. Mi Electric Scooter Pro 2 हे या स्कूटरचं नाव आहे. इलेक्ट्रिक स्कूटर प्रो 2 दमदार मोटर, डबल ब्रेकिंग सिस्टम, शॉक-अब्जॉर्बिंग नुमैटिक टायर आणि इजी फोल्डिंग डिझाईनने लेस आहे. या स्कूटरमध्ये 600 वॅट पावरफूल मोटर आहे. याची टॉप स्पिड 20 किमी प्रति ताशी आहे. याऐवजी याची रेंज 45 किमी आहे. या स्कूटरला आपण दररोज 20 टक्के इनक्लाइन हिल्समध्ये सहजरीत्या चढवू शकतो. शाओमीच्या या स्कूटरची किंमत जवळपास 70 हजार रुपये इतकी आहे.