इंधन दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक, पोस्टरबाजीतून मोदी सरकारवर निशाणा

0
154

इंधन दरवाढीवरून शिवसेनेनं राज्यात पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेनं मुंबईच्या अनेक पेट्रोल पंपावर चौकात बॅनर लावले आहेत. यामध्ये 2015 आणि 2021 पर्यंत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कशा आणि किती वाढल्या आहेत याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. इतकंच नाही तर हेच अच्छे दिन आहेत का? अशी टीका मोदी सरकारवर करण्यात आली आहे. इंधन दरवाढीला मोदी सरकारच जबाबदार असल्याची टीकास्त्र सोडण्यात आले आहे.