झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने केली मारहाण, महिलेने केला आरोप

0
30

बंगळुरुतील एका महिलेने झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपल्याला मारहाण केली असा दावा केला आहे. या महिलेने सोशल मिडीयावर स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने तिच्या नाकाला लागलेली दुखापत दाखवून ‘मला सपोर्ट करा’ असं देखील म्हणाली आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यानंतर त्या महिलेनं बंगळुरुतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर  काही वेळेतच त्या व्यक्तीला अटक करण्यात आलीये.

या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होताच झोमॅटो कंपनीने निवेदन प्रसिद्ध करत संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरुन हटवल्याची माहिती दिली आहे.

हितेशा चंद्राणी असे या पीडित महिलेचे नाव असून त्या ‘कंटेट क्रिएटर’ आहेत. त्यांनी व्हिडीओ “मी दुपारी 3.30 च्या दरम्यान झोमॅटोवर ऑर्डर बुक केली होती. एक तास होऊन गेला तरीदेखील कंपनीने ती ऑर्डर स्विकारली नव्हती. त्यामुळे मी ऑर्डर रद्द करुन सर्व पैसे परत देण्याची मागणी कंपनीच्या कस्टमर सर्व्हिसशी फोनवर करत होते, त्याचवेळी डिलिव्हरी बॉय घरामध्ये आला आणि त्याने मला मारहाण केली, ‘ असा दावा हितेशाने केला आहे. हितेशा यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली असून ते आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.